महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : अमितसह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची उपांत्यपूर्व फेरीत धडक - amit panghal in quarter final of wbc

मितने तुर्कीच्या बटूहान सिटफसीला ५-० ने पराभूत केले. अमितने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. आपल्या पहिल्या जागतिक पदकाच्या प्रतिक्षेत दुसऱ्या सीडेड अमितने सिटफसीला ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, असे हरवले. पुढच्या फेरीत २३ वर्षीय अमितची गाठ फिलिपिनो कार्लो पालमशी पडणार आहे.

विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीप : अमितसह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंची उपांत्यपूर्व फेरीत धडक

By

Published : Sep 18, 2019, 8:34 AM IST

Updated : Sep 20, 2019, 5:16 PM IST

कझाकिस्तान - भारताचा आघाडीचा बॉक्सिंगपटू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता अमित पांघलने विश्व बॉक्सिंग चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली आहे. त्याच्यासह भारताच्या चार बॉक्सिंगपटूंनीही उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.

हेही वाचा -उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी

अमितने तुर्कीच्या बटूहान सिटफसीला ५-० ने पराभूत केले. अमितने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ केला. आपल्या पहिल्या जागतिक पदकाच्या प्रतिक्षेत दुसऱ्या सीडेड अमितने सिटफसीला ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, ३०-२७, असे हरवले. पुढच्या फेरीत २३ वर्षीय अमितची गाठ फिलिपिनो कार्लो पालमशी पडणार आहे.

६३ किलो वजनी गटात मनीषने मोंगोलियाच्या चौथ्या मानांकित चिनझोरिग बाटारसुखचा ५-० असा सहज पराभव केला. तर, ९१ किलो वजनी गटात संजीतने उझबेकिस्तानच्या द्वितीय मानांकित संजर टुर्सुनोव्हचा ३-२ असा पराभव केला. आणि ६७ किलो वजनी गटात कविंदरने फिनलँडच्या अर्सलान खाटीव्हचा ३-२ असा पराभव केला.

Last Updated : Sep 20, 2019, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details