मुंबई - भारतीय धावपटू अमित खत्री याने नैरोबी येथे खेळवण्यात येत असलेल्या अंडर-20 विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये पदक जिंकलं आहे. अमितने पुरूष 10 हजार मीटर वॉक रेसमध्ये रौप्य पदकाला गवसणी घातली.
अमितने ही रेस 42 मिनिट 17.94 सेंकदात पूर्ण केली. भारताचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे. याआधी मिक्स्ड रिले 4x400 मीटरमध्ये भारताने कास्य पदक जिंकलं आहे. अमित या कामगिरीसह अंडर-20 विश्व अॅथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक जिंकणारा भारताचा पाचवा खेळाडू ठरला.
अमितची या हंगामातील सर्वोत्कृष्ट कामगिरी 40 मिनिट 40.97 सेंकद होती. अमित रेसमध्ये पुढे होता. पण त्याने ड्रिंक टेबलवर अधिक वेळ घालवला. या दरम्यान केनियाचा धावपटू हेरीस्टोन वानयोन्यी त्याच्या पुढे निघून गेला.