महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

डोपिंगप्रकरणी भारतीय वेटलिफ्टरवर ४ वर्षांची बंदी - भारतीय वेटलिफ्टर सरबजीत कौर न्यूज

सरबजीतने नाडाच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे अँटी डोपिंग शिस्त समितीने निवेदनात म्हटले आहे. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या महिलांच्या ३४ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दरम्यान सरबजीतचे नमुने घेण्यात आले होते.

Indian weightlifter Sarabjit Kaur banned for 4 years for doping
डोपिंगप्रकरणी भारतीय वेटलिफ्टरवर ४ वर्षांची बंदी

By

Published : Jan 8, 2020, 11:37 AM IST

नवी दिल्ली -काही दिवसांपूर्वी राष्ट्रकुल चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकणारी भारतीय वेटलिफ्टर सीमावर डोपिंगप्रकरणी ४ वर्षांची बंदी घालण्यात आली होती. आता भारताच्या अजून एका महिला वेटलिफ्टरला डोपिंगप्रकरणी ४ वर्षाच्या बंदीला सामोरे जावे लागणार आहे. भारतीय वेटलिफ्टर सरबजीत कौरवर नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सीने (नाडा) कारवाई केली आहे.

हेही वाचा -WWE मधील सामने फिक्स असतात!... 'द ग्रेट खली'ने केला गौप्यस्फोट

सरबजीतने नाडाच्या नियमांचे उल्लंघन केले असल्याचे अँटी डोपिंग शिस्त समितीने निवेदनात म्हटले आहे. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या महिलांच्या ३४ व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दरम्यान सरबजीतचे नमुने घेण्यात आले होते. सरबजीतचा तपशीलवार अहवाल एडवर्स अ‌ॅनालिटिक्स फाइंडिंग (एएएफ) कडे आला असून त्यात ती दोषी आढळल्याने ही ४ वर्षाच्या बंदीची कारवाई करण्यात आली.

ABOUT THE AUTHOR

...view details