नवी दिल्ली:अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (एआयएफएफ) गुरुवारी एका निवेदनात प्रसिद्ध केले. सध्या युरोप दौऱ्यावर असलेल्या 17 वर्षांखालील महिला फुटबॉल संघासोबत गैरवर्तनाची घटना घडल्याचे त्यात म्हटले आहे. एआयएफएफने कर्मचार्याचे नाव उघड केले नसले तरी, त्या व्यक्तीला तात्पुरते निलंबित केले आहे. पुढील तपास सुरू केला आहे.
"सध्या युरोप दौऱ्यावर असलेल्या अंडर-17 महिला संघात गैरवर्तनाची एक घटना नोंदवण्यात आली आहे," असे एआयएफएफने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. AIFF शिस्तिच्या बाबतीत कडक धोरण अवलंबते. प्राथमिक कारवाई म्हणून, फेडरेशनने पुढील तपास होईपर्यंत संबंधित व्यक्तीला तात्पुरते निलंबित केले आहे. एआयएफएफने संबंधित व्यक्तीला संघाशी सर्व संपर्क थांबवण्यास सांगितले. ताबडतोब भारतात परतण्यास आणि त्याच्या आगमनानंतर पुढील तपासासाठी प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास सांगितले आहे.