टोकियो - भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकत इतिहास रचला. तो अॅथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा भारताचा पहिला खेळाडू ठरला. या कामगिरीनंतर नीरज चोप्रा याने आपलं पुढील लक्ष्य सांगितलं आहे.
नीरज चोप्रा म्हणाला की, "भालाफेक ही एक टेकनिकल स्पर्धा आहे आणि यात फॉर्म निर्भर करतं. यामुळे मी माझं पुढील लक्ष्य 90 मीटर लांब भाला फेकणे आहे."
या वर्षी मी टोकियो ऑलिम्पिकवर लक्ष्य केंद्रित केलं होतं. आता सुवर्ण पदक जिंकलो आहे. पुढील स्पर्धेसाटी योजना आखेन. भारतात परतल्यानंतर इंटरनॅशनल स्पर्धेत भाग घेण्यासाठी विजा मिळवण्याचा प्रयत्न करेन, असे देखील नीरज चोप्रा म्हणाला.
नीरजने दिवंगत मिल्खा सिंगची अखेरची इच्छा पूर्ण केली
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने दिवंगत धावपटू मिल्खा सिंग यांची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे. अॅथलेटिक्समध्ये भारतीय खेळाडूने पदक जिंकावी, अशी इच्छा मिल्खा सिंग यांनी व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा नीरज चोप्रा याने पूर्ण केली. त्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये थेट सुवर्ण पदकाला गवसणी घातली.