मियामी: मियामी ओपनमध्ये नॉर्वेच्या कॅस्पर रुडविरुद्ध जेतेपद पटकावल्यानंतर स्पेनचा युवा टेनिसपटू कार्लोस अल्कराझने ( Young tennis player Carlos Alcaraz ) त्याला स्पॅनिश राजाने फोन ( Phone of the Spanish King ) केला होता, असा खुलासा केला आहे. 18 वर्षीय अल्कराझने सोमवारी मियामी येथे 7-5, 6-4 असा विजय मिळवला होता. स्पर्धेच्या 37 वर्षांच्या इतिहासात मियामी ओपन जिंकणारा तो पहिला स्पॅनिश खेळाडू ठरला. हे त्याचे पहिले एटीपी मास्टर्स 1000 विजेतेपद आहे.
संथ सुरुवातीपासून सावरत अल्कराझला कारकिर्दीतील सर्वात मोठे विजेतेपद ( The biggest championship of his career ) पटकावता आले. पण जेव्हा त्याला स्पेनचा राजा फेलिप सहावा याचा फोन आला तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. अल्कराझ एटीपीतुरला बोलताना म्हणाला की, “स्पॅनिश राजाचा फोन येणे खूप आश्चर्यकारक आहे. त्या फोनसाठी मी मॅचपेक्षा जास्त घाबरलो होतो. हे आश्चर्यकारक आहे की, स्पॅनिश राजा तुमचे कठोर परिश्रम आणि तुमच्या विजयाबद्दल तुमचे अभिनंदन करत आहे.