नवी दिल्ली : 24 मार्च रोजी अफगाणिस्तानने प्रथमच टी-20 सामन्यात पाकिस्तानचा पराभव करून ऐतिहासिक विजय नोंदवला. या विजयानंतर रशीद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान संघात पाकिस्तानविरुद्धची मालिका जिंकण्याची इच्छाशक्ती असल्याचे दिसून आली. अफगाणिस्तान संघाने हे सत्य सिद्ध केले आहे. अफगाणिस्तानने पाकिस्तानविरुद्ध सात गडी राखून शानदार विजय मिळवत पाकला पराभवाची चव चाखायला लावली.
अफगाणिस्तानची आघाडी :तीन टी-20 मालिकेतील शेवटचा सामना आज रात्री 9.30 वाजता खेळवला जाणार आहे. अफगाणिस्तानने आता मालिकेत 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात पाकिस्तानने सहा गडी गमावून 130 धावा केल्या. इमाद वसीमने 57 चेंडूत 64 धावांची नाबाद खेळी खेळली. कर्णधार शादाब खान 32 धावा करून धावबाद झाला. अब्दुल्ला शफीक आणि सैम अय्युब काही विशेष कामगिरी करू शकले नाहीत, दोघेही खाते न उघडताच बाद झाले.
एक चेंडू राखून विजय :तैयब ताहिरने 13 आणि आझम खानने 1 धावा केली. अफगाणिस्तानने 131 धावांचे लक्ष्य एक चेंडू राखून आधी पूर्ण केले. रहमानउल्ला गुरबाज (44) आणि इब्राहिम झद्रान (38) यांनी शानदार खेळी खेळली. उस्मान गनीने 7 धावा केल्या. तर मोहम्मद नबीने 14 आणि नजीबुल्ला जद्रानने 23 धावा केल्या. डावातील शेवटची दोन षटके खूपच रोमांचक होती. या सामन्यात रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रानने केलेली खेळीमुळे अफगाणिस्तानचा विजय सुकर झाला
अटीतटीचा सामना:अफगाणिस्तानला विजयासाठी 22 धावांची गरज होती. लक्ष्य अवघड होते पण मोहम्मद नबी आणि नजीबुल्ला जद्रान यांनी ते साध्य केले. अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. फारुकीने दोन गडी बाद केले. तर राशिद खान, नवीन-उल-हक आणि करीम जनात यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
हेही वाचा : Olympics Gold Medallist Neeraj Chopra : नीरज चोप्राची मुलांना सरप्राईज भेट; पाहा काय दिला संदेश