नवी दिल्ली - लॉकडाऊनवरील निर्बंध कमी होऊ लागल्याने लोकांनी घराबाहेर जाणे सुरू केले आहे. म्हणूनच, कोरोना संसर्ग टाळण्यासाठी आदिदास इंडियाने उच्च प्रतीचे फेस मास्क लाँच केले आहेत. तीन फेस मास्कच्या पॅकची किंमत 699 रुपये आहे. परफॉरमन्स आणि ओरिजिन ब्लू अशा दोन प्रकारांमध्ये हे मास्क आदिदासने लाँच केले आहेत.
आदिदास इंडियाचे वरिष्ठ विपणन संचालक मनीष सप्रा म्हणाले, "लॉकडाऊन बंदी शिथिल होत असताना आणि लोकांसाठी बाहेर पडताना सुरक्षा वाढवणे आवश्यक आहे. हे मास्क ड्रॉपलेट ट्रांसमिशनद्वारे विषाणू आणि जंतूंचा प्रसार रोखण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहेत. "