नवी दिल्ली -ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता भारताचा नेमबाज अभिनव बिंद्राने आगामी ऑलिम्पिक स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत. भारत येत्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत जास्तीत जास्त पदकांची कमाई करेल असा विश्वास बिंद्राने व्यक्त केला आहे.
बिंद्राने ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली. त्यात तो म्हणाला, 'एका वर्षानंतर मला खात्री आहे की भारतीय खेळाडू जास्तीत जास्त सुवर्ण पदक जिंकतील. सुवर्ण पदके जिंकण्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. जेणेकरुन ते या स्पर्धेत उत्तम कामगिरी करतील.'