नवी दिल्ली : माजी क्रिकेपटू हरभजन सिंगला ( Former cricketer Harbhajan Singh ) आम आदमी पार्टी द्विवार्षिक निवडणुकीत पंजाबमधून राज्यसभेवर पाठवू शकते. राज्यसभेतील खासदारांची संख्या वाढण्याची दाट शक्यता लक्षात घेऊन आम आदमी पार्टी लवकरच राज्यसभेच्या जागांसाठी नावांची घोषणा करू शकते. एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजाबमधील नवनिर्वाचित आप सरकार क्रीडा विद्यापीठाची कमानही ( Responsibility of Sports University ) हरभजन सिंगकडे सोपवू शकते.
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान ( Punjab CM Bhagwant Mann ) यांनी जालंधर येते क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचे वचन दिले आहे. आप पक्षाचा विजयी झाल्यानंतर हरभजन सिंगने ट्विटरवरुन भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या. भज्जी या नावाने प्रसिद्ध असलेला हरभजन म्हणाला होता, "पंजाबचा नवा मुख्यमंत्री झाल्याबद्दल आम आदमी पार्टी आणि माझे मित्र भगवंत मान यांचे अभिनंदन. चंदीगडमध्ये शपथ न घेण्याच्या निर्णयावर ते म्हणाले होते, शहीद-ए-आझम भगतसिंग यांचे गाव असलेल्या खटकरकलनमध्ये भगवंत मान नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे ऐकून खूप चांगले वाटले.