केरळ -येथे आयोजित केलेल्या ६३ व्या केरळ राज्य ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत एका विद्यार्थी स्वयंसेवकाचा मृत्यू झाला आहे. पाल येथील म्युनिसिपल स्टेडियममध्ये चॅम्पियनशिपच्या उद्घाटना दिवशी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. गंभीर जखमी झाल्यामुळे या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.
हेही वाचा -पगारवाढीसाठी बांगलादेशचे क्रिकेटपटू संपावर, टीम इंडियाला बसणार फटका?
अबेल जॉनसन असे या मृत विद्यार्थ्याचे नाव असून तो सेंट थॉमस उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकत होता. स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवशी जॉनसनला सुमारे ३५ मीटर मागे एका स्पर्धकाने फेकलेल्या ३ किलोच्या हातोड्याने डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर जॉनसनला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केरळमधील कोट्टायम जिल्ह्यातील पाला शहरातील म्युनिसिपल स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू होती. मात्र, जॉनसनच्या मृत्यूमुळे ही स्पर्धा स्थगित करण्यात आली आहे.