उज्जैन (मध्य प्रदेश ) -येथे राष्ट्रीय मल्लखांब चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 20 राज्यातील 800 हून अधिक खेळाडूंनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला आहे. यात बहुतांश महिला खेळाडूंचा समावेश आहे.
राष्ट्रीय मल्लखांब चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन एक वर्षानंतर करण्यात आले आहे. मागील वर्षी 2019-20 मध्ये ही स्पर्धा कोरोनामुळे घेण्यात आली नव्हती. आता ही स्पर्धा 2020-21 मध्ये होत आहे. 25 ते 30 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा रंगणार आहे. यात 5 वर्षांपासून ते 18 वर्ष वय असलेल्या खेळाडूंनी भाग घेतला आहे. पहिल्या तीन दिवशी म्हणजे 25 ते 27 या काळात ज्यूनियर प्रथम आणि द्वितीय मुलं-मुलीचे सामने पार पडतील. यानंतर 28 ते 30 सप्टेंबर या काळात सीनियर पुरूष, ज्यूनियर मुलं, सीनियर महिला, ज्यूनियर मुलांचे सामने होणार आहेत.
महिला खेळाडूंचा लक्षणीय सहभाग -
मल्लखांब खेळाला पुरूषी खेळ म्हणून पाहिले जाते. पण महिला देखील हा खेळ खेळताना पाहायला मिळत आहेत. राष्ट्रीय मल्लखांब चॅम्पियनशीप स्पर्धेत 800 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे. यात 50 टक्के खेळाडू महिला खेळाडू आहेत. यात सर्वात लहान खेळाडू पंजाबची आहे. तिचे वय 6 वर्ष असे असून नाव नाविका असे आहे.
पहिल्यांदाच महिलांसाठी फिक्स मल्लखांब -