नवी दिल्ली -भारताचा स्टार बॉक्सर अमित पांघलसह सात बॉक्सिंगपटू टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहे. या बॉक्सिंगपटूनी आशिया / ओशिनिया ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मात्र, जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक जिंकणार्या मनीष कौशिकचा ६३ किलो गटात पराभव झाला.
हेही वाचा -राशिदच्या 'कॅमल बॅट'चं रहस्य काय?
जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत कांस्यपदक विजेता भारताचा बॉक्सिंगपटू अमित पांघलने टोकियो ऑलिम्पिकसाठीचा प्रवास निश्चित केला. ५२ किलो वजनी गटातील या अटीतटीच्या सामन्यात अमितने फिलीपाईन्सच्या कार्लो पालमला ४-१ अशी मात दिली.
ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले भारतीय बॉक्सिंगपटू -
- अमित पांघल (५२ किलो वजनी गट)
- विकास कृष्णन (६९ किलो वजनी गट)
- पूजा रानी (७५ किलो वजनी गट)
- लवलीना बोर्गोहेन (६९ किलो वजनी गट)
- आशीष कुमार (७५ किलो वजनी गट)
- सतीश कुमार (९१ किलो वजनी गट)
- मेरी कोम (५१ किलो वजनी गट)