नवी दिल्ली:केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी 2022-23 साठी केंद्राचा अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये विविध क्षेत्रासाठी अनेक घोषणा आणि अनुदान जाहीर करण्यात आले. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांनी इतर क्षेत्रांबरोबर क्रीडा क्षेत्रासाठी देखील दिलासादायक अनुदान जाहीर केले आहे. ज्यामध्ये मागील वर्षापेक्षा तीनशे कोटींनी अधिक अनुदान जाहीर केले आहे. त्यामुळे आतापर्यंत क्रीडा क्षेत्राला देण्यात आलेले सर्वात जास्त आनुदान आहे. त्याचबरोबर नवनवीन योजना देखील आखण्यात आल्या आहेत.
कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षात इतर क्षेत्राप्रमाणे क्रीडा क्षेत्राला देखील मोठा फटका बसवला होता. ज्यामुळे बऱ्याच खेळाच्या स्पर्धा रद्द करण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मागील वर्षी 2020-21 मध्ये क्रीडा क्षेत्राला देण्यात आलेल्या अनुदानात कपात करण्यात आली होती. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात क्रीडा क्षेत्राला 2757.02 कोटी अनुदान देण्यात आले होते. ज्यामध्ये कोरोना महामारीमुळे कपात करुन 1878 कोटी केले गेले होते.