महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारताच्या सर्वात वयोवृद्ध अॅथलिटचे निधन

दिग्गज अॅथलिट मान कौर (105) यांनी आज शनिवारी दुपारी एक वाजता अंतिम श्वास घेतला. त्या मागील काही दिवसांपासून कॅन्सरने ग्रस्त होत्या.

105-year-old-athlete-man-kaur-dies
भारताच्या सर्वात वयोवृद्ध अॅथलिटचे निधन

By

Published : Jul 31, 2021, 4:23 PM IST

मुंबई -भारतीय दिग्गज महिला अॅथलिट मान कौर यांचे निधन झालं. त्या 105 वर्षांच्या होत्या. मागील काही दिवसांपासून त्या कॅन्सरने पीडित होत्या. त्यांच्यावर पंजामधील डेरा बस्सी येथील शुद्धी पंचकर्मा रुग्णालयात उपचार सुरू होते.

मान कौर यांचा मुलगा गुरदेव सिंह यांनी आज दुपारी 12 वाजता सांगितलं होत की, त्या आता ठिक होत आहेत. त्याच्या पोटातील त्रास देखील कमी होत आहे. त्या पहिलं पायांची हालचाल करू शकत नव्हत्या. पण आता त्या पायाची हालचाल करत आहेत. खुर्चीवर बसू शकत आहेत.

पण दुपारी एक वाजता अचानक मान कौर यांचे निधन झालं. याची माहिती देखील गुरदेव सिंह यांनी दिली.

मान कौर यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला होता. यात त्यांनी 35 हून अधिक पदक जिंकली. 2019 साली त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

हेही वाचा -Tokyo Olympics : भाऊ.. लवलिनानं उपांत्य फेरी गाठताच पदक पक्कं केलं, पण सिंधूचं का झालं नाही?

हेही वाचा -Tokyo Olympics : पोरींची कमाल! रोमांचक सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने आफ्रिकेला नमवलं

ABOUT THE AUTHOR

...view details