ऑकलंड - न्यूझीलंड दौर्याच्या दुसर्या सामन्यात भारताच्या वरिष्ठ महिला हॉकी संघाचा न्यूझीलंडकडून १-२ असा पराभव झाला आहे. न्यूझीलंडच्या संघाने सामन्याच्या तिसर्या मिनिटाला पेनल्टी गोलवर १-० अशी आघाडी मिळवली. यजमान संघाकडून मेगन हलने पहिला गोल नोंदवला.
हेही वाचा -VIDEO : कोबी ब्रायंटचा जगविख्यात 'फेड-अवे' फटका, काळाच्या पडद्याआड जाणार का ?
या गोलंनंतर भारताने दमदार पुनरागमन केले. पहिल्या क्वार्टरच्या अंतिम मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर भारताकडून सलीमा टेटेने गोल करत न्यूझीलंडशी बरोबरी साधली. दुसर्या व तिसर्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघ गोलरहित राहिल्यानंतर न्यूझीलंडने चौथ्या क्वार्टरमध्ये २-१ अशी आघाडी घेतली. न्यूझीलंडकडून हूलने दुसरा गोल केला.
शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंड डेव्हलपमेंट स्कॉडडचा ४-० असा पराभव केला होता. येत्या २९ जानेवारीला भारतीय संघ पुन्हा एकदा न्यूझीलंडसमोर उभा ठाकणार आहे.