महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जनता कर्फ्यूला महिला हॉकी खेळाडूंकडून भन्नाट प्रतिसाद, पाहा व्हिडिओ

देशवासियांनी एकत्र येत आज पाच वाजता गजर केला. यामध्ये क्रीडा विश्वही मागे राहिलेले नाही. भारताच्या हॉकी संघानेही पाच वाजता टाळ्या वाजवून गजर केला. त्यांचा व्हिडिओ भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

By

Published : Mar 22, 2020, 8:58 PM IST

Updated : Mar 22, 2020, 9:41 PM IST

watch indian womens hockey team fraternity come together to laud health workers amid janata curfew
जनता कर्फ्यूला महिला हॉकी खेळाडूंकडून भन्नाट प्रतिसाद, पाहा व्हिडिओ

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर आज देशभरात 'जनता कर्फ्यू' पार पडला. यात सायंकाळी पाच वाजता नागरिकांनी पाच मिनिटे गजर करत, आपल्याला सेवा देणाऱ्या व्यक्तींचे आभार मानले. भारताच्या महिला हॉकी संघानेही मोदींच्या या आवाहनाला प्रतिसाद दिला.

देशवासीयांनी एकत्र येत आज पाच वाजता गजर केला. यामध्ये क्रीडा विश्वही मागे राहिलेले नाही. भारताच्या हॉकी संघानेही पाच वाजता टाळ्या वाजवून गजर केला. त्यांचा व्हिडिओ भारताचे क्रीडा मंत्री किरण रिजिजू यांनी आपल्या ट्विटरवर पोस्ट केला आहे.

यात महिला हॉकी संघाचे खेळाडू एकत्रित टाळ्यांचा गजर करताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला देशभरामधून जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. आज सांयकाळी ५ वाजता देशवासियांनी टाळ्या-थाळ्या अन् घंटेचा नाद करत कोरोना विषाणू प्रादुर्भावासंदर्भात जनजागृती निर्माण करणाऱ्याचे आभार व्यक्त केले. जनतेसह राज्यांचे मुख्यमंत्री आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कोरोनाशी लढणाऱ्यांना टाळ्या वाजवून सलामी दिली.

दरम्यान, चीनमधून जगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूमुळे १२ हजाराहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. जगातील १५० हून अधिक देशांमध्ये याचा फैलाव झाला असून भारतातही ४०० हून अधिक जणांना याची बाधा झाली आहे. तर देशात कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे अनेक शहरं लॉकडाऊन करण्यात येत आहेत. प्रत्येक देश आपापल्या परीने यावर उपाययोजना करत आहे.

हेही वाचा -पाकिस्तानी खेळाडूला कोरोनाची भीती; घातले 'श्रीरामा'स साकडे..!

हेही वाचा -VIDEO : मोदींच्या 'जनता कर्फ्यू'ला धोनीसह चेन्नईच्या खेळाडूंनी टाळ्या वाजवून दिला प्रतिसाद

Last Updated : Mar 22, 2020, 9:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details