टोकियो - भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये पहिला विजय मिळवला. राणी रामपालच्या नेतृत्वात खेळणाऱ्या भारतीय संघाने आयर्लंडचा 1-0 ने पराभव केला. या विजयासह भारतीय संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचण्याच्या आशा कायम आहेत. भारताकडून एकमात्र गोल 57 व्या मिनिटाला नवनीत कौर हिने केला.
पहिल्या तीन क्वार्टरमध्ये भारत आणि आयरलँड संघाला एकही गोल करता आला नाही. परंतु चौथ्या क्वार्टरमधील 57 व्या मिनिटाला नवनीत कौरने गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. भारताला या सामन्यात 14 पेनाल्टी कॉर्नर मिळाले. पण यावर भारतीय खेळाडू गोल करण्यात अपयशी ठरले. यातील 10 पेनाल्टी कॉर्नर तर दुसऱ्या क्वार्टरमध्ये मिळाले.