महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपमध्ये झारखंडने केला महाराष्ट्राचा 3-1 असा पराभव - झारखंडने केला महाराष्ट्राचा 3-1 असा पराभव

11व्या हॉकी इंडिया ज्युनियर महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपचा दुसरा उपांत्य सामना झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यात झाला. ज्यामध्ये झारखंडने महाराष्ट्राचा 3-1 असा पराभव केला.

महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपम
महिला राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिपम

By

Published : Oct 28, 2021, 9:05 PM IST

सिमडेगा: 11 वी राष्ट्रीय ज्युनियर महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धा होत आहे. गुरुवारी दुसरा उपांत्य सामना झारखंड आणि महाराष्ट्र संघात झाला. अतिशय रोमहर्षक झालेल्या सामन्यात झारखंडने महाराष्ट्र संघाचा 3-1 असा पराभव केला. आता झारखंडचा सामना शुक्रवारी हरियाणाशी होणार आहे.

झारखंड आणि महाराष्ट्र यांच्यातील सामना अतिशय रोमांचक झाला. या सामन्यात दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. दुसऱ्या क्वार्टरच्या अखेरीस दोन्ही संघ बरोबरीत होते. तिसऱ्या क्वार्टरमध्ये झारखंडच्या संघाने गोल नोंदवून आघाडी घेतली, जी झारखंडच्या खेळाडूंनी तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरपर्यंत कायम राखली. चौथ्या क्वार्टरमध्ये झारखंड संघाने पेनल्टी कॉर्नरमध्ये बदल करत आघाडी तीन-एकने वाढवली.

पहिला उपांत्य सामना हरियाणा आणि चंदीगड यांच्यात झाला. ज्यामध्ये हरियाणाने चंदीगडचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. आता झारखंडचा सामना शुक्रवारी हरियाणाशी होणार आहे.

मंगळवारी झारखंड आणि पंजाब संघांमध्ये उपांत्यपूर्व फेरीचा सामना झाला. रोमांचक सामन्यात झारखंडने सरस कामगिरी करत पंजाबचा 6-2 असा पराभव केला. आणि झारखंडचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. तत्पूर्वी, झारखंड संघाने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात केरळचा पराभव केला होता. झारखंडने केरळचा 10-0 असा पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

हेही वाचा - T20 World Cup, Nam Vs Sco : नामिबियाचा ऐतिहासिक विजय, स्कॉटलंडला नमवलं

ABOUT THE AUTHOR

...view details