महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची राउरकेला येथे पायाभरणी - foundation stone hockey stadium

राउरकेला येथील बिजू पटनायक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये १५ एकर जागेवर हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे.

राउरकेला हॉकी स्टेडियम
राउरकेला हॉकी स्टेडियम

By

Published : Feb 17, 2021, 8:07 AM IST

भुवनेश्वर - ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी राउरकेला येथे देशातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची पायाभरणी केली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांचे नाव या स्टेडियमला देण्यात आले आहे. सुमारे २०,००० प्रेक्षकांच्या क्षमतेसह असणारे हे स्टेडियम २०२३ मध्ये पुरुष हॉकी विश्वचषकातील सामन्यांचे आयोजन करेल.

राउरकेला येथील बिजू पटनायक टेक्निकल युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये १५ एकर जागेवर हे स्टेडियम तयार करण्यात येणार आहे. हॉकी स्टेडियमच्या पायाभरणीनंतर पटनायक म्हणाले, “हॉकीचा आत्मा सुंदरगड जिल्ह्यातील माती, हवा आणि पाण्यात आहे आणि आता त्याने जगाच्या नकाशावर स्वत: ची स्थापना केली आहे. २०२३ च्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी राउरकेलाची निवड होणे ही मोठी बाब आहे.''

मुख्यमंत्र्यांनी हॉकीतील कलागुणांना वाव देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व १७ ब्लॉकमध्ये अ‍ॅस्ट्रोटर्फचा पायाभरणी केली आहे.

हेही वाचा -शाब्बाश बापू..! अक्षर पटेलच्या 'पंच'मुळे मोठ्या विक्रमाची नोंद

ABOUT THE AUTHOR

...view details