टोकियो -टोकियो ऑलिम्पिकच्या आठव्या दिवशी भारताने आणखी एक मेडल पक्के केले आहे. महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिने 69 किलो वर्गगटात सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. लवलीनाने बॉक्सिंगमध्ये पहिले पदक जवळपास निश्चित केले आहे.
बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधुने जोरदार प्रर्दशन करत तिनेही सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. सिंधु पदक जिंकण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. दरम्यान नेमबाज दीपिका कुमारी महिला गटात क्वार्टर फायनल सामन्यात पराभूत होऊन स्पर्धेबाहेर पडली आहे.