नवी दिल्ली -भारतीय पुरुष संघाचा कर्णधार मनप्रीत सिंग आणि महिला संघाची कर्णधार राणी रामपाल यांना यंदाच्या 'हॉकी इंडिया ध्रुव बत्रा प्लेअर ऑफ द इयर पुरस्काराने' गौरवण्यात आले. तर माजी दिग्गज खेळाडू हरबींदरसिंग यांना 'हॉकी इंडिया मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला.
हॉकी इंडिया पुरस्कार : मनप्रीत-राणी सर्वोत्तम हॉकीपटू - राणी रामपाल हॉकी इंडिया पुरस्कार न्यूज
रविवारी नवी दिल्ली येथे हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मनप्रीत आणि राणी यांना प्रत्येकी २५ लाख रुपये रोख तर, हरबिंदर यांना ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
रविवारी नवी दिल्ली येथे हा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. मनप्रीत आणि राणी यांना प्रत्येकी २५ लाख रुपये रोख तर, हरबिंदर यांना ३० लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.
या व्यतिरिक्त, विवेक सागर प्रसाद यांची हॉकी इंडिया जुगराजसिंग पुरस्कारासाठी (२१ वर्षाखालील सर्वोत्कृष्ट पुरुष खेळाडू) निवड झाली. त्याला दहा लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. हॉकी इंडिया असुंता लकडा पुरस्कार (२१ वर्षाखालील सर्वोत्कृष्ट महिला खेळाडू) लालरेमसिआमीला प्रदान करण्यात आला. तिलाही दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले.
अन्य पुरस्कार -
- हॉकी इंडिया धनराज पिल्ले फॉरवर्ड ऑफ द ईयर-२०१९ : मनदीप सिंग
- हॉकी इंडिया अजीत पाल सिंह मिडफील्डर ऑफ द ईयर-२०१९ : नेहा गोयल
- हॉकी इंडिया परगट सिंह अवार्ड डिफेंडर ऑफ द ईयर-२०१९ : हरमनप्रीत सिंग
- हॉकी इंडिया बलजीत सिंह गोलकीपर अवार्ड : कृष्ण बी पाठक
- हॉकी इंडिया जमन लाल शर्मा पुरस्कार : भारतीय खेल प्राधिकरण (SAI)
- हॉकी इंडिया प्रेसिडेंट ऑफ अवार्ड फॉर अचीवमेंट -२०१९ : ओडिशा सरकार