नवी दिल्ली - भारताच्या पुरूष हॉकी संघाने गेल्या १७ वर्षात पहिल्यांदा जागतिक क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे. नवीन जाहीर झालेल्या जागतिक क्रमवारीत भारतीय संघ चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. २००३ मध्ये 'एफआयएच जागतिक क्रमावारी'ला सुरुवात झाल्यानंतर भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे.
FIH RANKING : तब्बल १७ वर्षानंतर भारतानं केली मोठी कामगिरी
एफआयएच हॉकी प्रो लीगच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचा फायदा भारताला झाला आहे. जागतिक विजेता बेल्जियम अव्वल स्थानी आहे.
एफआयएच हॉकी प्रो लीगच्या पहिल्या तीन फेऱ्यांमध्ये केलेल्या सर्वोत्तम कामगिरीचा फायदा भारताला झाला आहे. ऑलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाची पाचव्या स्थानावर घसरण झाली आहे. जागतिक विजेता बेल्जियम अव्वल स्थानी आहे. त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्सचा क्रमांक लागतो. जर्मनी आणि इंग्लंड अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या स्थानावर आहेत. तर न्यूझीलंड आठव्या क्रमांकावर आहे.
महिला विभागात भारत नवव्या क्रमांकावर आहे. नेदरलँड्स संघाने प्रथम तर, ऑस्ट्रेलियाने दुसरे, अर्जेंटिनाने तिसरे, जर्मनीने चौथे आणि इंग्लंडने पाचवे स्थान मिळवले आहे.