महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

जर्मनी दौरा : भारतीय महिला हॉकी संघ मंगळवारी रवाना होणार

भारत आणि जर्मनी यांच्या महिला हॉकी संघात चार सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील मालिकेसाठी १८ सदस्यांचा, भारतीय महिला हॉकी संघ मंगळवारी जर्मनीला रवाना होणार आहे.

indian womens hockey team will leave for germany tour on tuesday
जर्मनी दौरा : भारतीय महिला हॉकी संघ मंगळवारी रवाना होणार

By

Published : Feb 22, 2021, 5:20 PM IST

नवी दिल्ली - भारत आणि जर्मनी यांच्या महिला हॉकी संघात चार सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. उभय संघातील मालिकेसाठी १८ सदस्यांचा, भारतीय महिला हॉकी संघ मंगळवारी जर्मनीला रवाना होणार आहे.

भारतीय संघ जर्मनी दौऱ्यात पहिला सामना २७ फेब्रुवारी खेळणार आहे. यानंतर २८ फेब्रुवारी रोजी दुसरा सामना होईल. यानंतर एक दिवसानंतर तिसरा सामना खेळला जाईल. अंतिम चौथा सामना ४ मार्चला होणार आहे.

दरम्यान, भारतीय संघाने जर्मनी दौऱ्याआधी अर्जेटिनाचा दौरा केला आहे. भारतीय महिला संघाने या दौऱ्यात सात सामने खेळली. अर्जेटिनाचा दौरा संपल्यानंतर भारतीय संघ बंगळुरूच्या साई सेंटरमध्ये सराव करत होता.

जर्मनी दौऱ्यासाठी असा आहे भारतीय महिला हॉकीचा संघ -

  • गोलकीपर - सविता (उपकर्णधार), रजनी
  • डिफेंडर्स : दीप ग्रेस एक्का, गुरजीत कौर, उदिता, निशा
  • मिड फील्डर्स : निक्की प्रधान, मोनिका, नेहा, लिलिमा मिंज, सुशीला चानू पुखरामबाम, सलिमा टेटे, नवजोत कौर
  • फॉरवडर्स : रानी (कर्णधार), लालरेमसियामी, नवनीत कौर, राजविन्दर कौर, शर्मिला देवी

हेही वाचा -भारतातील सर्वात मोठ्या हॉकी स्टेडियमची राउरकेला येथे पायाभरणी

हेही वाचा -खेळात थोड्या बदलाची गरज, आम्ही टॉप संघाना हरवू शकतो - राणी रामपाल

ABOUT THE AUTHOR

...view details