महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

महिला हॉकी : अखेरच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा भारतावर ४-० ने विजय - 3rd Match

आगामी महिला हॉकी सिरीज फायनल स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात असून ही स्पर्धा जपानमध्ये होणार आहे.

महिला हॉकी : अखेरच्या सामन्यात दक्षिण कोरियाचा भारतावर ४-० ने विजय

By

Published : May 25, 2019, 11:59 PM IST

जिनचीऑन -भारतीय महिला हॉकी संघ आणि दक्षिण कोरिया यांच्यात ३ हॉकी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात दक्षिण कोरियाने भारतावर ४-० असा एकतर्फी विजय मिळवला. मात्र या मालिकेतील पहिले २ सामने भारतीय महिला हॉकी संघाने जिकून मालिका २-१ ने आपल्या नावावर केली आहे.

दक्षिण कोरियासाठी जँग हीसानने पहिला गोल केला. त्यानंतर किम ह्युंजीने दुसरा आणि कँग जिना यांनीने तिसरा गोल करत संघाला मोठी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या ५३व्या मिनिटाला ली युरीने चौथा गोल दागत दक्षिण कोरियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. या पूर्ण सामन्यात भारताच्या हॉकी संघाला एकही गोल करता आला नाही.

आगामी महिला हॉकी सिरीज फायनल स्पर्धेच्या तयारीसाठी भारतीय संघासाठी हा दौरा महत्वाचा मानला जात असून ही स्पर्धा जपानमध्ये होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details