डुसेलडोर्फ (जर्मनी) - भारतीय महिला हॉकी संघाला जर्मनी दौऱ्यात सलग दुसऱ्या पराभवाला समोरे जावे लागले. यजमान संघाने दुसरा सामना १-० अशा फरकाने जिंकत चार सामन्याचा मालिकेत २-० ने आघाडी घेतली आहे.
आज खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात जर्मनीकडून मिडफिल्डर एमेली वॉर्टमॅन हिने २४ व्या मिनिटाला सामन्यातील एकमात्र गोल केला. यजमान संघाने सामन्याच्या अखेरपर्यंत ही आघाडी कायम राखली. भारतीय खेळाडूंना गोल करण्यात अपयश आलं आणि जर्मनीने दुसरा विजय नोंदवला.