महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

Tokyo Olympic : टोकियोत इतिहास घडविणाऱ्या हॉकीतील 16 रणरागिणी! - गुरजीत कौर

भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली.

http://10.10.50.70:6060///finalout1/delhi-nle/finalout/03-August-2021/12658593_monikamalik.JPG
indian women hockey teamThe 16 who scripted Indian womens hockey history in Tokyo Olympic 2021

By

Published : Aug 3, 2021, 5:46 PM IST

मुंबई -भारतीय महिला हॉकी संघाने टोकियो ऑलिम्पिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा पराभव करत इतिहास रचला. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 1-0 ने पराभव केला. या विजयासह भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक इतिहासात प्रथमच उपांत्य फेरी गाठली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय महिला संघाची चर्चा रंगली आहे. आज आम्ही तुम्हाला भारतीय महिला संघातील खेलाडूंची ओळख करून देणार आहोत.

भारतीय महिला हॉकी संघात हरियाणाचे सर्वाधिक 9 खेळाडू आहेत. ज्यात कर्णधार राणी रामपालचा समावेश आहे. याशिवाय झारखंड (2), ओडिशा (2), पंजाब (1), मणिपूर (1) आणि मिझोराम (1) येथील खेळाडूंचा समावेश आहेत. आता आपण खेळाडूंची ओळख करून घेऊ

आजोबानी सविताच्या हाती दिली हॉकी स्टिक, आता ती गोलकिपर आहे

सविता पुनिया

उपांत्यपूर्व सामन्यात 30 वर्षीय सविता पूनियाने महत्वपूर्ण योगदान दिले. तिने आतापर्यंत भारतासाठी 100 हून अधिक सामने खेळली आहेत. तीन ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सात पेनाल्टी कॉर्नर रोखले. ती मूळची हरियाणाची आहे. 2018 मध्ये सविताला अर्जुन पुरुस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

राणी रामपाल : हॉकी स्टीक नव्हते पैसे, आज भारतीय संघाची आहे कर्णधार

रानी रामपाल

राणी रामपालकडे एकवेळ हॉकी स्टीक खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. तीने ही माहिती एका मुलाखतीत सांगितली होती. ती मूळची हरियाणाची असून ती भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. तिचे वडिला टांगा चालवतात. तिला पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.

दीप ग्रेस एक्का : गोलकिपर बनण्याचे स्वप्न पण बनली बचावपटू

दीप ग्रेस एक्का

ओडिशामध्ये जन्मलेली 27 वर्षी दीप ग्रेस एक्काचे वडिल, काका आणि मोठा भाऊ स्थानिक हॉकीपटू आहेत. ती गोलकिपर बनू इच्छित होती. परंतु ती बचावपटू म्हणून भारतीय संघात खेळत आहे.

सुशीला चानू : भारतीय संघाची अनुभवी खेळाडू

सुशीला चानू

पी सुशीला चानू भारतीय संघाची अनुभवी खेळाडू आहे. तिने 180 अधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळली आहेत. 2008 मध्ये तिने आशिया कपमधून डेब्यू केला होता. चानू मणिपूरची असून तिचे आजोबा नामांकित पोलो खेळाडू होते. वडिल ड्रायव्हर आहेत.

निक्की प्रधान : ऑलिम्पिकसाठी टाळलं लग्न

निक्की

झारखंडची निक्की प्रधानने ऑलिम्पिकसाठी आपल लग्न टाळलं आहे. तिने भारतासाठी 100 हून अधिस सामने खेळली आहेत.

गुरजीत कौर : महिला हॉकीत सर्वश्रेष्ठ ड्रॅग फ्लिकर

गुरजीत कौर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यात गुरजीत कौरने 22 व्या मिनिटाला गोल केला. तिच्या गोलच्या जोरावरच भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचला. गुरजीत सर्वश्रेष्ट ड्रॅग फ्लिकर आहे. तिचा आदर्श संदीप सिंग आहे. ती मूळची पंजाबची आहे.

नवजोत कौर : संगीत आणि पेंटिंगची आवड असणारी

नवजोत कौर

26 साल की मिडफील्डर नवजोत कौरचा जन्म हरियाणा येथे झाला. तिला संगीत और पेंटिंगची आवड आहे.

मोनिका मलिक : वडिलाची कुस्तीपटूची इच्छा पण तिने हॉकीला पसंत केलं.

27 साल मिडफील्डर मोनिका मलिकचा जन्म सोनीपतमध्ये झाला. तिच्या वडिलांची इच्छा होती की तिन कुस्तीपटू व्हावं. पण मोनिकाने हॉकीची वाट धरली.

शर्मिला देवी : आजोबांनी हॉकीचे बाळकडू पाजलं

शर्मिला

शर्मिला देवी हरियाणाची असून तिला तिच्या आजोबांनी हॉकीचे बाळकडून पाजलं.

नेहा गोयल : प्रशिक्षकांनी शूज खरेदी करून दिले

नेहा गोयल

सोनीपतची रहिवाशी नेहा गोयलचे वडिला मजूर आहेत. तिला शूज घेणे शक्य नव्हते. यामुळे प्रशिक्षकांनी नेहाला शूज घेऊन दिले.

निशा : रेल्वेत नौकरी करत खेळली हॉकी

निशा

वडिलांना अर्धांगवायूचा झटका आला, तेव्हा कुटुंबाची जबाबदारी निशावर आली. तेव्हा तिने रेल्वेत क्लर्कची नौकरी करत हॉकी खेळली.

वंदना कटारिया : गावापासून टोकियो पर्यंतचा प्रवास

वंदना कटारिया

वंदना कटारियाकडे एकवेळ हॉकी स्टिक आणि शूज खरेदी करण्यासाठी पैसे नव्हते. ती एकटी हॉस्टेलमध्ये राहत होती.

उदिता : तीन दिवस हॅडबॉल प्रशिक्षक न आल्याने बनली हॉकीपटू

उदिता

उदिता हॅडबॉल प्लेअर होती. एकदा तीन दिवस हॅडबॉल प्रशिक्षक आले नाही. तेव्हा ती हॉकीकडे वळली.

लालरेमसियामी : वडिलांच्या निधनानंतरही हॉकी खेळणे सुरू ठेवले

लालरेम सिरामी

फारवॉर्ड लालरेम सियामी हिच्या वडिलांचे निधन झाले. तेव्हा देखील तिने हॉकी खेळणे सोडलं नाही. तीने भारताकडून 64 सामने खेळली आहेत.

नवनीत कौर : भारताची फॉरवर्ड प्लेअर

नवनीत कौर

नवनीत कौर भारताची अव्वल फॉरवर्ड प्लेअर आहे. तिचा जन्म मुजफ्परनगर येथे झाला. तिचे वडिल मेकॅनिक आहेत.

सलीमा टेटे : घरात टीव्ही नाही

सलीमा

झारखंडच्या सलीमा टेटेच्या घरी टीव्ही नाही. त्यामुळे तिचे आई वडिल सलीमाचा सामना पाहू शकले नाहीत. ती आसामची आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details