मार्लो -भारताच्या महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविताने इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात एका मोठ्या विक्रमाला गवसणी घातली. आज शुक्रवारी खेळला गेलेला पाचवा सामना हा सविताचा २०० वा आंतरराष्ट्रीय सामना होता. इंग्लंडविरुद्धचा हा सामना भारताने २-२ ने बरोबरीत सोडवला आहे. डर्बन येथे झालेल्या स्पार कप नेशन्स स्पर्धेत सविताने पदार्पण केले होते.
भारताच्या महिला हॉकी संघाची गोलरक्षक सविता हेही वाचा -जडेजाचा मोठा पराक्रम, कसोटीत साकारले सर्वात जलद बळींचे दुहेरी शतक
वयाच्या २० व्या वर्षी तिने टीम इंडियाच्या वरिष्ठ संघातून पदार्पण केले होते. २०१७ मध्ये कॅनडा येथे आयोजित केलेल्या हॉकी वर्ल्ड लीग राउंड-२ मध्ये सविताला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आले होते. २०१७ मध्ये भारताला आशिया चषक जिंकवण्यात सविताचा मोठा वाटा होता. या स्पर्धेतही तिला सर्वोत्कृष्ट गोलरक्षक म्हणून गौरवण्यात आले होते.
त्याअगोदर, २०१६ मध्ये महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणाऱया भारतीय संघातही सविताचा समावेश होता. याच वर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतही सविताने चांगली कामगिरी केली होती. २०१८ मध्ये सविताला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.