टोकियो - भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक टेस्ट इव्हेंट स्पर्धा जिंकली आहे. भारतीय संघाने अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघावर ५-० अशा फरकाने विजय मिळवला. सामन्यात भारतीय संघाने सुरुवातीपासून वर्चस्व निर्माण केले होते.
सामन्याच्या सुरुवातीच्या सातव्या मिनिटालाचा भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह याने पहिला गोल केला. त्यानंतर शमशेर सिंहने १८ व्या मिनिटाला, नीलाकांता शर्माने २२ व्या मिनिटाला गोल केला. त्यानंतर गुरसाहिबजीत सिंगने २६ व्या तर मनदीप सिंगने २७ व्या मिनिटाला गोल केला.