मलेशिया -प्रताप लाकडाच्या दोन गोलच्या जोरावर भारताने सुल्तान जोहोर कपमध्ये मलेशियाचा पराभव केला. या स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात भारताच्या ज्युनियर हॉकी संघाने यजमान मलेशियाला ४-२ ने हरवले.
हेही वाचा -जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धाः मंजूच्या रुपाने गोल्डच्या आशा कायम, भारताला तीन कांस्य
सामन्याच्या पहिल्या सत्रात भारत ०-२ ने पिछाडीवर होता. आठव्या मिनिटाला मोहम्मद हसन आणि नवव्या मिनिटाला मोहम्मद जैनुद्दीनने गोल करत मलेशियाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताकडून प्रतापने १९ व्या मिनिटाला गोल करत भारताचे खाते उघडले.
या गोलनंतर, ३३ व्या मिनिटाला प्रतापनेच पेनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले आणि मलेशियाच्या गोलसंख्येची बरोबरी साधली. या गोलच्या सहा मिनिटानंतर, शीलानंद लाकडाने गोल झळकावत भारताला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या अंतिम मिनिटांमध्ये उत्तम सिंहने गोल करत भारतासाठी चौथा गोल नोंदवला. या स्पर्धेत भारताचा दुसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे.