पर्थ - भारताचा आणि ऑस्ट्रेलिया पुरुष हॉकी संघामध्ये आज खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने ४-० ने एकतर्फी विजय मिळवला. ऑस्ट्रेलियासाठी ब्लेक गोवर्स आणि जैरेमी हेवार्ड यांनी प्रत्येकी २ गोल करत संघाला शानदार विजय मिळवून दिला. सामन्यातील अखेरच्या मिनिटामध्ये ऑस्ट्रेलियन संघाने २ गोल केलेत.
हॉकी : ४-० ने धुव्वा उडवत ऑस्ट्रेलियाची भारतावर एकतर्फी मात - ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलियासाठी ब्लेक गोवर्स आणि जैरेमी हेवार्ड यांनी केले प्रत्येकी २ गोल
ऑस्ट्रेलियाची भारतावर एकतर्फी मात
भारतीय संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असून यापूर्वी खेळल्या गेलेल्या ऑस्ट्रेलिया ‘अ’ आणि पश्चिम ऑस्ट्रेलिया थंडरस्टिक्सविरुद्धच्या सामन्यात भारताने दमदार विजय मिळवला होता. मात्र ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय संघाविरुद्ध भारताला आपली विजयी लय कायम राखता आली नसल्याने दारुण पराभव झाला.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा पुढचा सामना १७ मे ला खेळण्यात येणार आहे आहे.