क्वालालंपूर - भारतीय महिला हॉकी संघाने गुरुवारी चौथ्या सामन्यात यजमान मलेशियावर 1-0 ने विजय मिळवला. या विजयासह पाच सामन्यांची ही मालिका भारतीय संघाने 4-0 ने खिशात घातली आहे.
भारतीय महिला हॉकी संघाने उडवला मलेशियाचा धुव्वा, ४-० ने मालिका घातली खिशात - Malaysia
नवज्योत कौरने एकमात्र गोल करत संघाला मिळवून दिला विजय
मालिकेतील अखेरच्या सामन्यात नवज्योत कौरने भारतासाठी 35 व्या मिनीटात एकमात्र गोल करत संघाला विजय मिळवून दिला. 5 सामन्यांच्या या मालिकेतील तिसरा सामना हा अनिर्णित राहीला होता.
भारतीय संघाचे प्रक्षिशक शुअर्ड मरिनेने या मोठ्या विजयानंतर सांगितले की, मी संघाच्या कामगिरीवर खूप खूश आहे. या दौऱ्यावर आम्हाला समजले की, मलेशियासारख्या संघाविरुद्ध बचावात्मक खेळ कसा करावा. तसेच आमच्या संघातील युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळाल्याने त्याचा फायदा भविष्यात भारतीय संघाला होईल. शुक्रवारी भारतीय संघ मायदेशात परतनार आहे.