नवी दिल्ली -भारताच्या पुरुष हॉकी संघाने आपला विजयी धडाका सुरुच ठेवला आहे. पहिल्या सामन्यात बेल्जियमला पछाडल्यानंतर शनिवारी खेळलेल्या सामन्यात भारताने स्पेनचा धुव्वा उडवला. भारताने दुसऱ्या सामन्यात स्पेनला ६-१ अशा गोल फरकाने मात दिली.
हेही वाचा -पाक सैन्याच्या या 'बाहुल्या'नेच काश्मीरमध्ये शांतता टिकवण्याची भाषा केली होती, गंभीरचे खडे बोल
पहिल्या सत्रात मनप्रीत सिंगने २४ व्या मिनिटाला गोल करत भारताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चार मिनिटांच्या फरकाने हरमनप्रीत सिंगने पेनल्टी कॉर्नरवर अजून एक गोल झळकावत भारताला आघाडी मिळवून दिली. पहिले सत्र संपण्याच्या आधी स्पेनने आक्रमक खेळ करत आपल्या गोलचे खाते उघडले.
सामन्याच्या दुसऱ्या सत्रात मात्र भारतीय खेळाडूंनी स्पेनच्या खेळाडूंना संधीच दिली नाही. या सत्रात भारतीय खेळाडूंनी चार गोल केले. भारतासाठी शेवटचा गोल रूपिंदर पाल सिंगने केला. या सामन्यात भारताकडून हरमनप्रीत सिंगने दो गोल केले. तर, मनप्रीत सिंग, मनदीप सिंग, नीलकांत शर्मा, रूपिंदर पाल सिंग यांनी प्रत्येकी एक-एक गोल केला आहे.