मुंबई - अझलन शाह चषकातील भारत आणि कोरिया यांच्यात झालेला रोमांचक सामना ड्रॉ झाला. कोरियाने सामन्यातील शेवटच्या ३० सेंकदात पेनल्टी कॉर्नरवर गोल करत पराभवाचे संकट टाळले आणि सामना १-१ ने बरोबरीत सुटला.
अझलन शाह कप: भारत-कोरिया सामना झाला 'ड्रॉ' - 1-1
भारतीय हॉकी संघाचा फॉरर्वड प्लेयर मनदीप सिंगने सामन्याच्या २८ मिनिटात गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली.

भारत-कोरिया सामना झाला 'ड्रॉ'
भारतीय हॉकी संघाचा फॉरर्वड प्लेयर मनदीप सिंगने सामन्याच्या २८ मिनिटात गोल करत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर भारताच्या संघाला गोल करता आले नाही. कोरियाने मात्र, शेवटच्या ३० सेंकदात गोल करत भारताचा विजयाचा घास हिरावून घेतला. यापूर्वी शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने जपान २-० ने हरविले होते.