महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

पुरुष हॉकी : भारताकडून मलेशियाचा धुव्वा, ६-० ने केली मात - गुरसाहिबजीत सिंह

भारतीय संघाकडून आपला १०० वा सामना खेळणाऱ्या गुरसाहिबजीत सिंहने १८ आणि ५६ व्या मिनिटाला दोन गोल केले. त्याचबरोबर, मनदीप सिंहने ३४ आणि ४७ व्या मिनिटाला दोन गोल केले.

पुरुष हॉकी : भारताकडून मलेशियाचा धुव्वा, ६-० ने मात

By

Published : Aug 17, 2019, 6:15 PM IST

टोकियो -ऑलिम्पिकसाठीच्या सराव हॉकी स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने आज शनिवारी मलेशियाचा धुव्वा उडवला. भारताने मलेशियावर ६-० ने मात केली.

जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असणाऱ्या भारतीय संघाने पहिल्या सत्रात २-० ने आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रातही भारताने चांगली कामगिरी केली.

भारतीय संघाकडून आपला १०० वा सामना खेळणाऱ्या गुरसाहिबजीत सिंहने १८ आणि ५६ व्या मिनिटाला दोन गोल केले. त्याचबरोबर, मनदीप सिंहने ३४ आणि ४७ व्या मिनिटाला दोन गोल केले. तर उरलेले दोन गोल वरुण कुमार आणि एस. व्ही. सुनीलने केले.

याच स्पर्धेतील महिलांच्या गटात, भारतीय महिला हॉकी संघाने आज शनिवारी यजमान जपानचा पराभव केला. अटीतटीच्या सामन्यात भारतीय महिलांनी सामन्यात २-१ अशी बाजी मारली. या विजयासह भारतीय संघाने स्पर्धेत विजयी सुरुवात केली आहे. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध रविवारी होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details