महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

मलेशिया दौऱ्यासाठी १८ सदस्यीय भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा - team

भारतीय महिला संघ मलेशियाविरुद्ध क्वालालंपूर येथे ५ सामन्यांची मालिका खेळणार

womens hockey team

By

Published : Mar 28, 2019, 6:56 PM IST

नवी दिल्ली - हॉकी इंडियाने ४ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या मलेशिया दौऱ्यासाठी बुधवारी भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ मलेशियाविरुद्ध क्वालालंपूर येथे ५ सामन्यांची मालिका खेळणार आहे.

आठ दिवसाच्या या दौऱ्यासाठी गोलरक्षक सविता पुनियाकडे भारतीय संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. तर दीप ग्रेसला उपकर्णधारपद देण्यात आलंय. सवितासोबत रजनी एतिमरपूची गोलकीपर म्हणून निवड करण्यात आली आहे. तसेच बचावासाठी दीपसोबत सुशीला चानू आणि सुनिता लाक्रा यांसारख्या अनुभवी खेळाडूंना स्थान देण्यात आलं आहे.

मलेशिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ

गोलकिपर - सविता आणि रजनी एतिमरपू

डिफेंडर : सलीमा टेटे, सुनिता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, रीना खोखर, रश्मिता मिंज आणि सुशीला चानू.

मिडफील्डर : मोनिका, करिश्मा यादव, निक्की प्रधान, नेहा गोयल आणि लिलिमा मिंज.

फारवर्ड : ज्योति, वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवज्योत कौर आणि नवनीत कौर.

ABOUT THE AUTHOR

...view details