महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय पुरुष हॉकी संघाची घोषणा, रुपिंदरचे संघात पुनरागमन - australia

या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी सुरेंदर कुमारकडे देण्यात आलीय

भारतीय संघ

By

Published : May 1, 2019, 7:15 PM IST

नवी दिल्ली -हॉकी इंडियाकडून 10 मे पासून होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी 18 सदस्यीय भारतीय पुरुष संघाची घोषणा आज करण्यात आली आहे. या संघात भारताचा ड्रॅग-फ्लिकर रुपिंदर पाल सिंगचे पुनरागमन झाले आहे.


जाहीर केलेल्या या संघाचे नेतृत्व मनप्रीत सिंगकडे सोपवण्यात आले असून उपकर्णधारपदाची जबाबदारी सुरेंदर कुमारकडे देण्यात आली आहे. तर संघाच्या गोलरक्षणाची जबाबदारी ही कृशन . बी. पाठक आणि पी. आर. श्रीजेश यांच्यावर असेल.


भारतीय पुरुष हॉकी संघाचे नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक ग्राहम रीड यांचा हा पहिलाच विदेश दौरा असणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ एकुण 4 सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठीचा भारतीय संघ
कृशन बी पाठक, पीआर श्रीजेश (गोलकीपर), रुपिंदर पाल सिंग, सुरेंदर कुमार (उपकर्णधार), हरमनप्रीत सिंग, बिरेंदर लाक्रा, गुरिंदर सिंग, कोठाजीत सिंग (डिफेंडर), हार्दिक सिंग, मनप्रीत सिंग (कर्णधार), जसकरण सिंग, विवेक सागर प्रसाद, निळकंठ शर्मा (मिडफील्डर), मनदीप सिंग, गुरसाहिबजीत सिंग, आकाशदीप सिंग, सुमीत कुमार ज्युनियर, अरमान कुरेशी (फॉरवर्ड).

ABOUT THE AUTHOR

...view details