नवी दिल्ली -हॉकी इंडियाने शनिवारी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढा देण्यासाठी पंतप्रधान रिलीफ फंडामध्ये आणखी ७५ लाख रुपयांची देणगी जाहीर केली. आतापर्यंत हॉकी इंडियाने एक कोटी रुपयांची मदत केली आहे. तत्पूर्वी, हॉकी इंडिया कार्यकारी बोर्डाने पंतप्रधान मदत निधीसाठी 25 लाख रुपयांची देणगी दिली होती.
कोरोना युद्ध : हॉकी इंडियाकडून १ कोटींची मदत - hockey india latest news
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की, सध्याचे संकट पाहता आम्हाला सरकारबरोबर उभे राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कठीण काळात संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे.
![कोरोना युद्ध : हॉकी इंडियाकडून १ कोटींची मदत hockey india donated 1 crore to fight corona](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6660077-thumbnail-3x2-aa.jpg)
कोरोना युद्ध : हॉकी इंडियाकडून १ कोटींची मदत
हॉकी इंडियाचे अध्यक्ष मोहम्मद मुश्ताक अहमद यांनी एका निवेदनात म्हटले आहे, की सध्याचे संकट पाहता आम्हाला सरकारबरोबर उभे राहण्याची गरज आहे. कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या कठीण काळात संघर्ष करण्यासाठी एकत्र येण्याची आणि जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य बजावण्याची गरज आहे.
हॉकीला नेहमीच देशातील लोकांकडून खूप प्रेम आणि पाठिंबा मिळाला आहे आणि या आजाराविरूद्ध विजयी होण्यासाठी वतीने जे काही करता येईल ते आम्ही करू, असेही अहमद म्हणाले.