नवी दिल्ली - हरियाणाचे क्रीडा मंत्री संदीप सिंग यांनी सांगितलं की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरूष हॉकी संघाने जिंकलेले कास्य पदक हे सुवर्ण पदकापेक्षा कमी नाही. दरम्यान, हरियाणा सरकार 13 ऑगस्ट रोजी आपल्या अॅथलिटचा सन्मान सोहळा करणार आहे.
संदीप सिंग यांनी आयएएनएसशी बोलताना सांगितलं की, आम्ही 13 ऑगस्ट रोजी एक कार्यक्रम आयोजित करणार आहोत. ज्यात आमच्या राज्यातील अॅथिलिट ज्यांनी टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभाग नोंदवला होता. त्यांचा रोख बक्षिस देत सन्मान केला जाणार आहे.
दरम्यान, हरियाणा सरकारने सुवर्ण पदक विजेता नीरज चोप्राला सहा करोड तर रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी कुमार दहियाला चार करोड रुपयांच्या बक्षिसाची घोषणा केली आहे. याशिवाय कास्य पदक विजेता भारतीय पुरूष संघात सहभागी हरियाणाच्या खेळाडूंना प्रत्येकी अडीच कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. भारतीय महिला हॉकी संघातील हरियाणाच्या खेळाडूंना सरकार प्रत्येकी 50 लाख रुपये देणार आहे.
संदीप सिंग म्हणाले, आम्ही फक्त जाहीर केलेली बक्षिसे देत नाही आहोत, याशिवाय आणखी बक्षिस देत आहोत. आम्ही फक्त विजेत्या खेळाडूंचाच सन्मान करणार नाही तर सर्व सहभागी खेळाडूंचा देखील सत्कार आम्ही करू. आम्ही ऑलिम्पिकला जाणाऱ्या राज्यातील सर्व खेळाडूंना प्रत्येकी 15 लाख रुपये बक्षिस म्हणून देणार आहेत.