महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार काळाच्या पडद्याआड - सुनीता चंद्रा लेटेस्ट न्यूज

सुनीता चंद्रा १९५६ ते १९६६ या कालावधीत भारतीय महिला हॉकी संघाकडून खेळल्या होत्या. १९६३ ते १९६६  या काळात त्यांनी संघाचे कर्णधारपदही भूषवले होते.

former indian women hockey team captain sunita chandra passes away
भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार काळाच्या पडद्याआड

By

Published : Jan 28, 2020, 10:21 AM IST

नवी दिल्ली - भारतीय महिला हॉकी संघाची माजी कर्णधार आणि अर्जुन पुरस्कार प्राप्त खेळाडू सुनीता चंद्रा यांचे सोमवारी सकाळी निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. चंद्रा यांचा मुलगा गौरव चंद्रा यांनी त्यांच्या निधनाची बातमी दिली.

हेही वाचा -'अरे निदान स्क्रीन गार्ड तरी बदल', चाहत्याचा स्टार फु़टबॉलपटूला सल्ला

सुनीता चंद्रा १९५६ ते १९६६ या कालावधीत भारतीय महिला हॉकी संघाकडून खेळल्या होत्या. १९६३ ते १९६६ या काळात त्यांनी संघाचे कर्णधारपदही भूषवले होते. त्यांच्या पश्चात दोन मुले आहेत. सुनीता यांचे पती म्हणजे यतीश चंद्रा हे आयपीएस अधिकारी आहेत.

सुनीता यांच्यावर आज मंगळवारी भोपाळ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे यतीश चंद्रा यांनी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details