लॉसने - कोरोना विषाणूंच्या वाढत्या घटनांमुळे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनने (एफआयएच) हॉकी प्रो-लीग १७ मेपर्यंत तहकूब केली आहे. एफआयएचने गुरुवारी निवेदन पाठवून यासंदर्भात माहिती दिली.
हेही वाचा -'कोरोनाची भीती वाटते? भिऊ नका क्रिकेट खेळायला आमच्याकडे या'
'कोविड -१९ बाबत अलिकडील परिस्थिती आणि जागतिक पातळीवरील सरकारांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे एफआयएच हॉकी प्रो लीग १७ मेपर्यंत तहकूब करण्यात आली आहे', असे एफआयएचने निवेदनात म्हटले आहे.
'१७ मे पर्यंत होणारे सर्व सामने थांबवण्यात आले आहेत. एफआयएच परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करेल आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) आणि सरकारांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करेल,' एफआयएचने असेही निवेदनात म्हटले आहे.