महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

कोरोनाग्रस्त हॉकीपटू मनदीप सिंग रुग्णालयात दाखल - mandeep singh admitted news

"१० ऑगस्टच्या (सोमवारी) रात्री मनदीप सिंगच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. कॅम्पसमधील प्राधिकरणाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी मनदीपला तातडीने एसएस स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे'', असे असे प्राधिकरणाने सांगितले.

corona positive hockey player mandeep singh admitted to hospital
कोरोनाग्रस्त हॉकीपटू मनदीप सिंग रुग्णालयात दाखल

By

Published : Aug 11, 2020, 2:45 PM IST

बंगळुरू - कोरोनाची लागण झालेला भारतीय हॉकी संघाचा खेळाडू मनदीप सिंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रकृती बिघडल्याने मनदीपला रूग्णालयात नेण्यात आले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (SAI) ही माहिती दिली.

"१० ऑगस्टच्या (सोमवारी) रात्री मनदीप सिंगच्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी कमी झाली. कॅम्पसमधील प्राधिकरणाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी मनदीपला तातडीने एसएस स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्याची प्रकृती स्थिर आहे'', असे असे प्राधिकरणाने सांगितले.

४ ऑगस्ट रोजी बंगळुरू येथील केंद्रात राष्ट्रीय शिबिरासाठी झालेल्या तपासात मनदीपशिवाय मनप्रीत सिंग, सुरेंद्र कुमार, जसकरण सिंग, वरुण कुमार आणि कृष्णा पाठक हे कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह असल्याचे आढळले.

भारतात रविवारी 62 हजार 64 नवे कोरोनाबाधित आढळल्याने रुग्णसंख्या 22 लाखांवर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आणखी 1007 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. देशात एकूण 44 हजार 386 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील कोरोना रुग्णसंख्या 22 लाखांवर पोहोचली असली तरी बरे होण्याचा दर 69.33 एवढा आहे. 4 लाख 77 हजार 23 नमुन्यांची तपासणी रविवारी करण्यात आली, अशी माहिती आयसीएमआरने दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details