महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

हॉकी : भारतीय संघाची विजयी हॅट्रीक, स्पेनचा ५-१ ने केला पराभव - india thrash spain

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या बेल्जिअम संघाचा २-० ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्पेनचा ६-१ ने पराभव केला होता. त्यानंतर आज पुन्हा स्पेनचा पराभव करत स्पर्धेत विजयी धडाका कायम ठेवला आहे.

हॉकी : युरोप दौऱ्यात भारतीय संघाची विजयी हॅट्रिक, स्पेनचा ५-१ ने केला पराभव

By

Published : Sep 29, 2019, 9:49 PM IST

Updated : Oct 1, 2019, 9:16 PM IST

एंटवर्प ( बेल्जिअम ) - भारतीय पुरुष हॉकी संघाने एंटवर्पमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत विजयाची 'हॅट्रीक' साधली आहे. आज (रविवार) स्पेनविरुध्द झालेल्या लढतीत भारतीय संघाने स्पेनचा ५-१ असा पराभव केला. दरम्यान, या मालिकेत अद्याप आणखी दोन सामने शिल्लक राहिले आहेत.

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान असलेल्या बेल्जियम संघाचा २-० ने पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात स्पेनचा ६-१ ने पराभव केला होता. त्यानंतर आज पुन्हा स्पेनचा पराभव करत स्पर्धेत विजयी धडाका कायम ठेवला आहे.

युरोपच्या दौऱ्यात भारतीय संघाची स्पेन आणि यजमान बेल्जियम विरोधात ५ सामन्याची मालिका सुरू आहे. या मालिकेतील सुरूवातीचे तीनही सामने भारताने जिंकले आहेत. मालिकेत आणखी दोन सामने शिल्लक असून दोनही सामने भारतीय संघाला यजमान बेल्जियम विरुध्द खेळावयाची आहेत.

हेही वाचा ःहॉकी : भारतीय संघाने उडवला विश्वविजेता बेल्जियमचा २-० धुव्वा

स्पेन विरुध्दच्या तिसऱ्या सामन्यात भारतीय खेळाडू हरमनप्रीत सिंह याने दोन गोल केले. तर आकाशदीप सिंह, एसवी सुनिल, रमनदीप सिंह यांनी प्रत्येकी एक-एक गोल करत संघाच्या विजयात हातभार लावला.

सामन्यात भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या हाफच्या तिसऱ्या मिनिटाला इग्लेसियास अल्वारो याने गोल करत स्पेनला बढत मिळवून दिली. त्यानंतर भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. आकाशदीपच्या गोलने भारताने सामन्यात बरोबरी साधली.

यानंतर २० व्या मिनिटाला सुनिलने शानदार मुव्ह करत गोल केला आणि २-१ ने भारताला बढत मिळवून दिली. ३५ व्या मिनिटाला रमनदीप, ४१ व्या मिनिटाला हरमनप्रीत आणि पुन्हा ५१ व्या मिनिटाला हरमनप्रीतनेच गोल करत संघाच्या विजयाला शिकामोर्तब केले. दरम्यान, या मालिकेतील पुढील चौथा सामना १ ऑक्टोंबरला बेल्जियम विरोधात होणार आहे.

हेही वाचा ःहॉकी : भारताकडून स्पेनचा धुव्वा, केली ६-१ ने मात

Last Updated : Oct 1, 2019, 9:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details