नवी दिल्ली- हॉकी इंडियाने २० मे पासून सुरू होणाऱ्या दक्षिण कोरिया दौऱ्यासाठी बुधवारी भारताच्या १८ सदस्यीय महिला संघाची घोषणा केली आहे. भारतीय महिला संघ दक्षिण कोरियाविरुद्ध जिनचुन येथील नॅशनल अॅथलेटिक सेंटरवर ३ सामने खेळणार आहे.
दक्षिण कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा - india
राणी रामपालकडे असेल भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी
दक्षिण कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघाची घोषणा
या दौऱ्यासाठी शूअर्ड मरिन यांच्या मार्गदर्शनाखाली राणी रामपालकडे भारतीय संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर गोलकिपर सविताकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय हॉकी महामंडळाच्या जपानमध्ये होणाऱ्या महिला हॉकी सिरीज फायनल स्पर्धेच्या तयारीसाठी हा दौरा महत्वाचा मानला जात आहे. ही स्पर्धा १५ ते २३ जून यादरम्यान खेळली जाणार आहे.
दक्षिण कोरिया दौऱ्यासाठी भारतीय महिला हॉकी संघ
- गोलकिपर : सविता आणि रजनी एतिमरपू
- डिफेंडर : सलीमा टेटे, सुनिता लाक्रा, दीप ग्रेस इक्का, करिश्मा यादव, गुरजीत कौर आणि सुशीला चानू.
- मिडफील्डर : मोनिका, नवजोत कौर, निक्की प्रधान, नेहा गोयल आणि लिलिमा मिंज.
- फारवर्ड : राणी रामपाल (कर्णधार), वंदना कटारिया, लालरेमसियामी, ज्योति आणि नवनीत कौर.