कोलकाता - विश्वचषक पात्रता फुटबॉल स्पर्धेचा बांगलादेश विरुध्दच्या सामना भारताने १-१ ने बरोबरीत राखला. यापूर्वी कतारला भारताने गोलशून्य बरोबरीत रोखले होते. यामुळे भारताने ‘ई’ गटात तीन सामन्यांत दोन बरोबरी आणि एका पराभवासह दोन गुण जमा आहेत. दरम्यान, बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात हिरो ठरला आक्रमणपटू आदिल खान. त्याने सामन्याच्या ८८ व्या मिनिटाला हेडरव्दारे गोल करत भारताला लाजीरवाण्या पराभवापासून वाचवले. आदिल बांगलादेश सामन्यात खेळत असताना त्याचे वडिलांचे 'ऑपरेशन' सुरू होते.
भारत विरुध्द बांगलादेश संघामध्ये कोलकाताच्या सॉल्ट लेक स्टेडियममध्ये रंगलेल्या सामन्यात फुटबॉलप्रेमींना थरार अनुभवायला मिळाला. मात्र, या सामन्यापूर्वी आदिल खानचे वडील बदरुद्दीन खान रुग्णालयात अॅडमिट होते. ते ह्रदय विकाराने ग्रस्त असल्याने त्यांचे ऑपरेशन सुरू होते. वडिलांची ही बातमी त्याच्या कुटुंबीयांनी फोनवरून त्याला दिली. अशा कठीण परिस्थितीत आदिल सामना खेळण्यास तयार झाला.
आदिलने ही बातमी अन्य कोणालाही सांगितली नाही. त्याने बांगलादेश विरुध्दच्या सामन्यात चांगला खेळ करण्यावर भर दिला. दरम्यान, या सामन्यात आदिलचा खेळ सुरुवातीला चांगला झाला नाही. सामन्यात आदिल चुकीमुळे बांगलादेशला गोल करण्याची संधी मिळाली. मात्र, गोल वाचवण्यात भारताला यश आले. तेव्हा या चुकीची भरपाई आदिलने ८८ व्या मिनिटाला गोल करत केली. आदिलच्य या गोलमुळे सामना १-१ ने बरोबरीत सुटला.