महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी विचार करणार - भुतिया - bhaichung bhutia on aiff latest news

भुतियाने फेसबुकवरून ही माहिती दिली. भविष्यात या गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ शकते असे, त्याने म्हटले. सध्या तो सिक्कीममधील भू-स्तरीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे.

Will think about becoming AIFF president in future said bhaichung bhutia
अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षपदासाठी विचार करणार - भुतिया

By

Published : Apr 12, 2020, 5:47 PM IST

नवी दिल्ली - भारतीय फुटबॉल संघाचा माजी कर्णधार बायचुंग भुतियाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) मुख्यपदाबाबत महत्त्वाचे विधान केले आहे. आगामी काळात एआयएफएफच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी विचारात असल्याचे भुतियाने सांगितले.

भुतियाने फेसबुकवरून ही माहिती दिली. भविष्यात या गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ शकते असे, त्याने म्हटले. सध्या तो सिक्कीममधील भू-स्तरीय कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे.

“मी सध्या फुटबॉल शाळांच्या काही तळागाळातील कार्यक्रमांमध्ये सामील आहे. तसेच मी राज्य संघटनेतही कार्यरत आहे”,असे भुतियाने फेसबुकवर सांगितले आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details