महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / sports

व्हिडिओ : रोनाल्डोने जिंकला प्रतिष्ठित 'गोल्डन फूट' पुरस्कार - ख्रिस्तियानो रोनाल्डो लेटेस्ट न्यूज

''हा पुरस्कार मिळविणे हा सन्मान आहे, मला आनंद आहे की माझे हे पायांचे चिन्ह महान लोकांच्या जवळ राहील. ज्यांनी मला मतदान केले त्या सर्वांचे मी आभारी आहे. मी नेहमीच चांगले खेळण्यासाठी व गोल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन'', असे रोनाल्डोने पुरस्कार पटकावल्यानंतर सांगितले.

Watch: Ronaldo Scoops 2020 Golden Foot Award
व्हिडिओ : रोनाल्डोने जिंकला प्रतिष्ठित 'गोल्डन फूट' पुरस्कार

By

Published : Dec 21, 2020, 7:39 AM IST

नवी दिल्ली - पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीला मागे टाकत 'गोल्डन फूट' पुरस्कार जिंकला आहे. रोनाल्डोने आतापर्यंत ५ वेळा बालोन डी ओर पुरस्कार जिंकला आहे. तर, मेस्सीने ६ वेळा या पुरस्कारावर आपले नाव कोरले आहे.

'गोल्डन फूट' पुरस्कार

हेही वाचा -योगायोगाचा १९ डिसेंबर!...एकाच दिवशी भारताने रचली उच्चांकी आणि निचांकी धावसंख्या

मात्र, यावेळी रोनाल्डो मेस्सीपेक्षा उजवा ठरला आहे. कारण, मेस्सीला अद्याप गोल्डन फूट पुरस्कार जिंकता आलेला नाही. ''हा पुरस्कार मिळविणे हा सन्मान आहे, मला आनंद आहे की माझे हे पायांचे चिन्ह महान लोकांच्या जवळ राहील. ज्यांनी मला मतदान केले त्या सर्वांचे मी आभारी आहे. मी नेहमीच चांगले खेळण्यासाठी व गोल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन'', असे रोनाल्डोने पुरस्कार पटकावल्यानंतर सांगितले.

ख्रिस्तियानो रोनाल्डो

गोल्डन फूट पुरस्काराच्या बाबतीत ...

२००३ मध्ये 'गोल्डन फूट' पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. हा पुरस्कार २८ पेक्षा जास्त वय असलेल्या खेळाडूला एकदाच दिला जातो. रॉबर्टो बॅगिओ, अलेसॅन्ड्रो डेल पियरो, रोनाल्डिन्हो या खेळाडूंनीही हा पुरस्कार जिंकला आहे. ३५ वर्षीय रोनाल्डोने यंदा क्लब आणि देशासाठी मिळून ४४ गोल केले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details