लंडन - फुटबॉलच्या मैदानात पोर्तुगालचा दिग्गज फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याला तोड नाही. व्यक्तिगत जीवनात असंख्य समस्या असूनही रोनाल्डो मैदानात हास्य घेऊन उतरतो. मात्र, त्याची खेळातील आक्रमता वाखाणण्याजोगी असते. असा हरहुन्नरी खेळाडू रोनाल्डो, एका टीव्ही शोच्या मुलाखतीदरम्यान हळवा झाला आणि त्याला आपले आश्रू रोखता आहे नाही.
झाले असे की, पियर्स मार्गन यांनी रोनाल्डोची मुलाखत घेतली. या मुलाखतीदरम्यान, रोनाल्डोच्या दिवंगत वडिलांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला. तेव्हा रोनाल्डोला आपले आश्रू रोखता आले नाही. तो ढसढसा रडू लागला.
या मुलाखतीत दाखवण्यात आलेला व्हिडिओ २००४ मध्ये युरो कपच्या आधीचा आहे. या व्हिडिओत वडील जॉस डेनिस हे रोनाल्डोच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त करताना दिसत आहेत.
दरम्यान, २००४ साली युरो कप पोर्तुगालमध्ये आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेनंतर काही दिवसांनी रोनाल्डोच्या वडिलांचे लिव्हर खराब झाल्याने, निधन झाले होते.
मुलाखतीनंतर, रोनाल्डो याला वडिलांनी केलेल्या कौतूकाबद्दल तुला काय वाटत असे विचारले असता तो म्हणाला, 'मला खूप भारी वाटले.' तसेच त्याला मुलाखतीविषयी विचारले असता, ही मुलाखत सहज हसत खेळत होईल असे वाटले होते पण कधी रडेन असे वाटले नव्हते. असे त्यांने सांगितले.
वडील दारू प्यायचे त्यामुळे त्यांच्याशी कधीच माझ नीट बोलणं झाले नाही, असेही रोनाल्डो म्हणाला. दरम्यान, रोनाल्डोवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. याविषयी त्याने आपले वाईट अनुभवही मुलाखतीत कथन केले.