नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये संबंध बळकट करण्यासाठी प्रयत्न केले. यामुळे त्याने शनिवारी संयुक्त अरब अमिरातीमध्ये ‘ऑर्डर ऑफ झायेद’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ऑर्डर ऑफ झायेद हा यूएईमधला सर्वोच्च नागरी पूरस्कार आहे. यापूर्वी हा पुरस्कार रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन, क्वीन एलिझाबेथ (दुसऱ्या) चीनचे राष्ट्रध्यक्ष शी जिपनिंग यांना देण्यात आला आहे. तर खेळ या क्षेत्रात हा पुरस्कार जियानी इन्फँटिनो यांना २००३ साली देण्यात आला आहे.
फिफाचे अध्यक्ष मूळचे स्वित्झरलँडचे जियानी इन्फँटिनो यांना हा पुरस्कार २००३ ला देण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फीफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो यांची भेट झाली आहे. मोदी यांनी अर्जेंटिना येथे आयोजित ब्यूनस आयर्स सम्मेलन दरम्यान, इन्फँटिनो यांची भेट घेतली होती. या भेटीत इन्फँटिनो यांनी 'मोदी' असे लिहलेली जर्सी भेट पंतप्रधान यांना म्हणून दिली होती.