CHAMPIONS LEAGUE: टोटेनहॅम हॉट्स्परचा डॉर्टमंडवर धमाकेदार विजय - बोरुसिया डॉर्टमंड
सामन्यात टोटेनहॅमने चांगला खेळ करताना डॉर्टमंडवर ३-० अशा मोठ्या गोलफरकाने विजय मिळवला आहे. या विजयासह टोटेनहॅमने पुढील फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
टोटेनहॅम
लंडन- चॅम्पियन्स लीगच्या अंतिम -१६ मध्ये यजमान टोटेनहॅम हॉट्स्परसमोर बोरुसिया डॉर्टमंडचे कडवे आव्हान होते. सामन्यात टोटेनहॅमने चांगला खेळ करताना डॉर्टमंडवर ३-० अशा मोठ्या गोलफरकाने विजय मिळवला आहे. या विजयासह टोटेनहॅमने पुढील फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला आहे.
सामन्याच्या पहिल्या सत्रात बोरुसिया डॉर्टमंडने चांगला खेळ केला. परंतु, संघाला गोल करण्यात अपयश आले. दुसऱ्या सत्रात टोटेनहॅमने सामन्याची सुत्रे हातात घेताना चांगला खेळ केला. दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीलाच सन हेंग मिनने ४७ व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. यानंतर, सामन्याच्या उत्तरार्धात ८३ व्या मिनिटाला जे. व्हर्टोघन आणि ८६ व्या मिनिटाला लोरेंटेने गोल करत संघाचा ३-० ने विजय निश्चित केला.
प्रमुख खेळाडू हॅरी केनच्या अनुपस्थितीत टोटेनहॅमने चांगला खेळ केला. परतीच्या लढतीत आता टोटेनहॅमला ३ गोलची आघाडी असणार आहे. त्यामुळे, पुढील फेरीत टोटेनहॅमचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.